लोकसभेपासून राष्ट्रवादी-भाजपची सेटिंग -राज ठाकरे

October 11, 2014 12:09 AM0 commentsViews:

11 ऑक्टोबर : युती आणि आघाडी तुटणं हे निश्चित होतं यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपची सेटिंग लोकसभेपासूनच सुरू होती, तुम्ही युती तोडा आम्ही आघाडी तोडू असं शरद पवार यांनी अगोदरच ठरवलं होतं असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. पुण्यात झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. भाजपने 60 उमेदवार आयात केले आहे. भाजपकडे प्रचारासाठी चेहरा नाही. यांचा नेत्यांना कुणी मत देणार नाही. त्यामुळे मोदींना आज सभा घ्याव्या लागत आहे. पण नरेंद्र मोदी नक्की कुणाचा प्रचार करतात ? भाजपचा की काँग्रेस, राष्ट्रवादीचा असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close