कैलाश सत्यार्थी यांची यशोगाथा

December 10, 2014 1:15 PM0 commentsViews:

satyarthi
बचपन बचाओ आंदोलनाच्या माध्यमातून बालकामगार विरोधी चळवळ उभारणारे सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांना प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार आज प्रदान होणार आहे

बुटपॉलिश करणार्‍या सहा वर्षाच्या मुलाला सत्यार्थी यांनी पाहिलं आणि बालकांसाठी आयुष्यभर काम करण्याची ठिणगी त्यांच्या मनात पडली. गेली 30 वर्ष याच ध्येयानं त्यांचं अविरत काम सुरू आहे आणि त्यांच्या आयुष्याचं हेच उद्दिष्ट आहे. बालकांना त्यांचे हक्क मिळवून देणं. मध्य प्रदेशतल्या विदिशामध्ये 11 जानेवारी 1954 रोजी त्यांचा जन्म झाला. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर झाल्यानंतर 26 व्या वषच् त्यांनी नोकरी सोडली आणि बालकांच्या हक्कांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. यातूनच 1980 मध्ये जन्म झाला ‘बचपन बचाओ आंदोलनाचा’. महात्मा गांधी हे त्यांचं प्रेरणास्थान आहेत.

बालविवाह रोखणं, बालकांची विक्री थांबवणं, त्यांना शिक्षणाचे हक्क मिळवून देणं ही कामं ‘बचपन बचाओ’च्या माध्यमातून होऊ लागली. भारतातल्या 11 राज्यांमध्ये 356 गावं त्यांनी ‘बाल मित्र ग्राम’ बनवली. यासाठी त्यांना प्रचंड झगडावं लागलं. अनेक वादळं त्यांनी अंगावर घेतली, उपेक्षा सहन केली, अपमान पत्कारला मात्र आपल्या ध्येय्यापासून ते कधीच ढळले नाही. आत्तापर्यंत त्यांनी तब्बल 80 हजार मुलांची सुटका केली. ‘रुगमार्क’ नावाच्या टॅगमार्कचेही ते प्रणेते आहेत. बालमजुरांचा सहभाग नसलेल्या ना हा टॅग लावला जातो. ‘बचपन बचाओ’ ला जगातला सर्वोच्च पुरस्कार मिळाल्यानं आता लहान मुलांच्या चेहर्‍यांवरचं हसु आणखी फुलणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close