वर्ल्डकपसाठी धोनी बिग्रेड लंडनमध्ये दाखल

May 30, 2009 1:07 PM0 commentsViews: 1

30 मे टी-20 वर्ल्डकपसाठी महेंद्रसिंग धोणीच्या कॅप्टन्सीखाली भारताची यंग ब्रिगेड लंडनमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा दाखल झाली. 2007 साली भारतानं जिंकलेल्या पहिल्या – वहिल्या टी-20 वर्ल्ड कपच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. आता याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा विश्वास टीम इंडियानं व्यक्त केलाय. 6 जूनला भारताची पहिली वहिल्या मॅच होणार आहे. या शिवाय भारत दोन सराव मॅचही खेळणार आहे. नॉटिंगहमला रवाना होण्यापूर्वी भारताच्या न्यूझीलंड आणि पाकिस्तानविरोधात प्रॅक्टीस मॅचेस होणार आहेत. टीममध्ये आत्मज्विश्वास दिसत असला तरी काही आव्हनंही आहेत. सेहवाग आणि गंभीर या ओपनिंग जोडीच्या कामगिरीत सातत्य नाही आहे. तर दुसरीकडे युवराज सिंग आणि इशांत शर्मा यांचाही फॉर्म चांगला नाही, झहीर खानची दुखापत अजुनही पूर्णत: बरी झालेली नाही. एवढं असुनही 2007 साली भारताने जिंकलेल्या पहिल्या वहिल्या टी-20 वर्ल्ड कपची पुनरावृत्ती करण्याचा विश्वास इन टीमने व्यक्त केला आहे.

close