काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी कायम – शरद पवार यांची भूमिका

May 30, 2009 2:03 PM0 commentsViews: 1

30 मे विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी कायम रहावी अशी भूमिका केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची आहे. पवारांनी त्यांची भूमिका पंढरपूरमध्ये भरलेल्या राज्यातल्या सगळ्यात मोठ्या एस.टी.स्टॅडच्या उद्घाटना सोहळ्याप्रसंगी व्यक्त केली. त्यावेळी त्यांच्याबरोबर उर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदे हेही उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यात मिळालेल्या यशानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी स्वबळावर लढण्याची भाषा सुरू केली. मात्र काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीये. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र लढलं पाहिजे असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

close