नितेश राणेंचा असाही ‘स्वाभिमान’, शिवसैनिकाला पाठिंबा

October 11, 2014 10:49 PM0 commentsViews:

pandharpur11 ऑक्टोबर : काँग्रेसचे नेते नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेचे आणि शिवसेनेचे सख्य सगळ्यांनाच माहिती आहे. पण याला अपवाद असणार आहे तो पंढरपूर मंगळवेढा या विधानसभा मतदार संघाचा.. इथे स्वभिमान संघटनेचे राज्याचे संपर्क प्रमुख सागर यादव यांनी शिवसेनेचे उमेदवार समाधान आवताडे यांना जाहीर पाठिंबा दिलाय. धक्कादायक बाब म्हणजे या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार असतानाही यादव यांनी आपली युवा शक्ती शिवसेनेच्या मागे उभी केल्याने राज्याच्या राजकारणात हा नवा दोस्ताना अधिक दृढ होतो की या मतदारसंघापुरता मर्यादित राहतो ते पाहावे लागेल.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close