औरंगाबाद आरटीओ ऑफीसमध्ये गोळीबार : अकाऊटंट ऑफिसरचा मृत्यू

May 30, 2009 2:28 PM0 commentsViews: 10

30 मे औरंगाबादच्या आरटीओ ऑफिसमध्ये आज दुपारी गोळीबार झाला. या गोळीबारातअकाऊंट ऑफिसर कोंडावार यांचा मृत्यू झालाय. आरोपी सचिन तायडेचे वडील आर.बी. तायडे हे लिपीक म्हणून काम करत होते. अंबाजोगाई आरटीओमध्ये 12 लाख 29 हजाराचा अपहार केल्याप्रकरणी 2008 मध्ये तायडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर निलंबितही करण्यात आलं. या सगळ्या अपहरणाची नागपूर ऑडीट कमिटीनं चौकशी केली. त्यात 39 लाखाचा अपहार केल्याचं निष्पन्न झालं. हे सगळ झाल्यानंतर सचिन तायडे आरटीओ अधिकारी अशोक गिरी यांच्याशी चर्चा करण्यासाठी आला होता. गुन्हा मागे घ्यावा आणि प्रकरण मिटवावं अशी चर्चा सुरु असताना वाद वाढत गेला. बाजूला असलेले अकाऊंट ऑफिसर डी.एस. कोंडावर यांच्यावर त्यांनी रागाच्या भरात गोळी झाडली. मुख्य आरोपी सचिन तायडे फरार आहे. या घटनेबाबत पोलीस उपायुक्त एम.बी.तांबडे यांनी सांगितलं की, सचिन तायडे याचे वडील आर.बी.तायडे बीड जिल्हयातील अंबाईजोगाईच्या आरटीओ ऑफिसर होते. 2008 साली त्यांनी आरटीओमध्ये 12 लाख 39 हजार रूपयांचा अफरातफर केली होती. याची चौकशी नागपूरच्या ऑडिट कमिटीने केली. या कमिटीत मयत अकाऊटंन्ट ऑफिसर होनावर हेही होते. चौकशीअंती आरटीओ ऑफिसर आर.बी.तायडे यांनी 39 लाखांची अफरातफर केल्याचं निष्पन्न झाल्याने त्यांना कामावरून बडतर्फ करण्यात आल होतं. वडिलांना पुन्हा कामावर घ्या, जो काही दंड आहे तो आम्ही भरायला तयार आहोत, हे सांगायला आरटीओ ऑफिसर अशोक गिरी यांना भेटण्यासाठी सचिन तायडे ऑफिसमध्ये गेला होता. आरटीओ ऑफिसर अशोक गिरी यांनी हे प्रकरण आपल्या हातात नसून लातूर आरटीओ ऑफिसच्या अखत्यारीत आहे, असं सांगितलं. त्यामुळे राग अनावर झालेल्या सचिन तायडे याने समोर असलेल्या अकाऊटंन्ट ऑफिसर होनावर यांच्यावर गोळीबार केला.

close