शाब्बास रे मतदारराजा ! म्हणतो, ‘आम्हाला बाटली..पाहिजे बाटली’

October 11, 2014 11:08 PM0 commentsViews:

11 ऑक्टोबर : साहेब, मत कुणाला द्यायचं याचा आम्ही विचार करत नाही. त्यांचं आम्हाला घेणंदेणं नाही. आम्हाला फक्त बाटली पाहिजे,बाटली…जो पैसे देईल त्याला खायाचा…त्याला मत द्यायाचं..आजवर आमची कुणी कामं करत नाही मत आमची फुकट जातात…हे म्हणतोय मतदाराराजा…निवडणुका निष्पक्ष वातावरणात व्हाव्यात असा निवडणूक आयोगाचा प्रयत्न असतो. प्रत्यक्षात मात्र सध्या निवडणुकीच्या आधी पैसे, दारु आणि मटण यांची खैरात होतेय. सोयीसुविधांपासून दूर असलेला गरीब, बेरोजगार तरुण या मोहाला बळी पडण्याची शक्यता असते आणि पक्ष याचा फायदा घेत आहेत. डहाणूमध्ये तर याची स्पष्ट कबुलीच बेरोजगार तरुणांनी दिलीय. दुदैर्वाने निवडणुकांमुळे आपलं भविष्य बदलणार नाही, कुठलेच नेते काम करणार नाहीत असं या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना वाटतंय. त्यामुळेच हा तरूण स्पष्टपणे याची जाहीर कबुलीच देतोय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close