‘जो’ गुन्हा दाखल झालाय तो माहिती नाही -अजित पवार

October 11, 2014 10:08 PM0 commentsViews:

Ajit pawar11 ऑक्टोबर : आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अजित पवार यांच्यावर जो गुन्हा दाखल झालाय त्याप्रकरणी मला अजून काहीही माहिती नाही. पण मी संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधणार असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिलंय. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.

कोल्हापूर उत्तरचे राष्ट्रवादीचे उमेदवार आर. के. पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार कोल्हापूरमध्ये आले होते. त्यावेळी सभेनंतर बोलताना त्यांनी मी माझी भूमिका मांडेन पण उर्वरीत रक्कम ही पक्षाच्या जिल्हाध्यक्षांसाठी होती असंही पवारांनी म्हटलंय. तसंच विधानसभा निवडणुकीत 145 पेक्षा जास्त जागा राष्ट्रवादीला मिळतील असं सांगत अजित पवार यांनी मोदींनी बारामतीबद्दल बोलणं उचित नाही असंही म्हटलंय. त्यामुळे आता अजित पवारांवर काय कारवाई होणार हे पहावं लागणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close