आबांनीच आमच्या उमेदवारावर खोटे गुन्हे दाखल केले -राज ठाकरे

October 11, 2014 11:43 PM0 commentsViews:

11 ऑक्टोबर : सुधाकर खाडे यांच्यावर 2007 साली आर.आर.पाटील यांनी पोलिसांना हाताशी धरून आपल्या पदाचा गैरवापर करत खोटे गुन्हे दाखल केले होते असा पलटवार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. ते नाशिकमध्ये बोलत होते.

राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांची बलात्कारावर बोलताना जीभ घसरली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकच्या सभेत पाटील यांच्या वक्तव्याचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. व्वा रे व्वा माजी गृहमंत्री निवडणुका झाल्यावर बलात्कार करायचा म्हणजे निवडून आल्यावर बलात्कार करायचा का ? कसले हे नेते. यांचे दादा तसेच आणि अध्यक्षही तसेच आहे. याचे दादा धरणावर बोलता तर पवारसाहेब दोनदा मतदान करा असा सल्ला देतायत दुसरं तिसरं काही नाही यांना आता सत्तेचा माज आलाय अशी विखारी टीका राज ठाकरे यांनी केली. तसंच आमचे उमदेवार सुधाकर खाडे यांच्यावर 2007 साली आर.आर.पाटील यांनीच खोटे गुन्हे दाखल केले होते असा पलटवारही राज यांनी केला. आबा म्हणता विनोदाने तसं बोललो पण विनोद जमत नसेल तर करता कशाला असा टोलाही राज यांनी लगावला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close