उद्धव ठाकरे करणार शक्तीशाली महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण घोषणा

October 12, 2014 10:21 AM4 commentsViews:

 

shivsena uddhav
12 ऑक्टोबर : शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’मध्ये आज रविवारी ‘महाराष्ट्राच्या सुवर्णयुगाची सुरुवात होत आहे’, अशा आशयाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज (रविवारी) मुंबईत वांद्रे इथल्या बी.के.सी मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेत उद्धव ठाकरे ‘शक्तीशाली महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण घोषणा करणार! असल्याचं सांगण्यात आलं आहे.

या सभेत शिवसेना जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परिसरातल्या सर्व शाखांना याबाबत खास सूचनाही शिवसेनेनं दिल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजच्या जाहीर सभेत नक्की कोणती महत्त्वपूर्ण घोषणा करणार याकडे माध्यमांसह सर्वांचंच लक्ष्य लागलं आहे. सर्वचजण म्हणत आहेत काय असणार ‘ती’ घोषणा?

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Sham Dhumal

  सामना पेपरमधिल बातम्या शिवसेनेलाच त्रासदायक असतात.

 • Sham Dhumal

  तुमच्या चुकीच्या निर्णयांमुळे शिवसेना कमजोर होत आहे.
  त्याबद्दल कधी विचार करणार?

 • Sham Dhumal

  बाळासाहेबांनी शिवसेना सतत वाढविली. उध्दव ठाकरेंनी ताबा घेतल्यानंतर अनेक मोठे नेते शिवसेनेतून बाहेर पडले. कोणामुळे?

 • Sham Dhumal

  १) भ्रष्टाचार, घोटाळे रोखण्यासाठी सक्षम लोकपाल असायला पाहीजे की नको?
  २) लोकपालला विरोध करणे योग्य आहे का?
  ३) लोकपालला कोणी (कोणत्या राजकीय पक्षाने) विरोध केला?
  ४) लोकपालला विरोध म्हणजेच जनतेला विरोध नाही का?
  ५) जनतेला विरोध करुन जनतेकडे मते कशी मागणार?

close