बारावीच्या परीक्षेचा निकाल 4 जूनला

May 30, 2009 2:34 PM0 commentsViews: 1

30 मे बारावीच्या परीक्षेचा निकाल येत्या चार जूनला जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्याआठही विभागातून एकाचवेळी हे निकाल जाहीर केले जातील. बारावीची गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार नाही. परंतु, बक्षीसपात्र विजेत्यांचा गौरव राज्य सरकारतर्फे केला जाईल. या परीक्षेला राज्यभरातून 11 लाख 84 हजार 226 विद्यार्थी बसले होते. यापैकी 6 लाख 90 हजार 139 मुलं आहेत. तर 4 लाख 94 हजार 87 मुली आहेत.

close