रशियात पाच वर्षांच्या मुलीला मिळाली जनावरांसारखी वागणूक

May 30, 2009 3:07 PM0 commentsViews: 1

30 मे लहानपण किती निरागस असतं ना… लहानपणी मुलांवर जसे आपण संस्कार करू, जशा वातावरणात त्यांना वाढवू तशी त्यांची जडणघडण होते. रशियातल्या नताशा नावाच्या 5 वर्षांच्या मुलीच्या बाबतीत मात्र तसं झालं नाही. नताशाला तीच्या आई-वडिलांनी कुत्रा-मांजरांसोबत एका रूममध्ये बंद करुन ठेवलं होतं. त्यामुळे तिला बोलता येत नाही. तिला दोन पायांवर चालत नाही. तर चालताना तिला हातही वापरावे लागतात. तिच्या या अवस्थेसाठी जबाबदार असलेल्या आई-वडलांना अटक करण्यात आली आहे. नताशा वागणुकीमुळे ती दोन वर्षांची वाटते. पण प्रत्यक्षात तिचं वय 5 वर्षं आहे.

close