अ.भा. नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी फैय्याज यांची निवड

October 12, 2014 6:29 PM0 commentsViews:

faiyaz12 ऑक्टोबर : 95 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेत्री आणि गायिका फैय्याज यांची एकमतानं निवड झाली. आज नाट्यपरिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हे नाट्यसंमेलन जानेवारीत होणार आहे. फैयाज यांनी अनेक मराठी नाटकांत काम केली आहेत. तसंच आपल्या उत्कृष्ट अभिनयाने त्यांनी मराठी व हिंदी सिनेसृष्टीही गाजवली आहे. ” 2005 साली हुकलेली संधी 2014 मध्ये मिळाली, त्यामुळे मला खुप आनंद झालाय. मराठी भाषेसाठी काहीतरी करण्याची ही मला संधी मिळाली आहे तिच सोनं मी करेन ”, अशा शब्दात प्रतिक्रिया फैयाज यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना दिली. फैय्याज यांना अनेक वेळा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close