भावाच्या प्रेमापेक्षा लाल दिव्याची गाडी महत्त्वाची नाही -सुळे

October 12, 2014 6:35 PM0 commentsViews:

supriya sule and ajit pawar12 ऑक्टोबर : लाल दिव्यासाठी मी आणि माझा भाऊ म्हणजेच अजित पवार भांडणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय. कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत त्यांना त्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी वेळ आली तर अजित पवार राज्याचं नेतृत्व करतील असं सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षपणे सुचित केलं. याअगोदरही सुप्रिया सुळे यांनी अजितदादांची पाठराखण केली होती. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छाही त्यांनी अनेक वेळा बोलून दाखवली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close