शेतीचं बदलतं अर्थकारण

October 12, 2014 7:17 PM1 commentViews:

ऍग्रिकल्चर इज कल्चर ऑफ इंडिया म्हणजे शेती ही भारताची संस्कृती आहे, असे म्हटले जाते. पूर्वी ती वस्तुस्थिती होती. आता ती स्थिती दिवसेंदिवस बदलत चालली आहे. दोनशे वर्षापूर्वी इंग्रजांनी सर्व बाबतीत स्वयंपूर्ण असणारी ग्रामस्वराज्याची व्यवस्था मोडून काढली होती. तरीही पन्नास- साठ वर्षापूर्वीपर्यंत उत्तम शेती, मध्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी असेच मानले जात असे. आज 21 व्या शतकात उत्तम नोकरी, मध्यम धंदा आणि कनिष्ठ शेती अशी स्थिती झाली आहे, कारण आमच्या कृषी आधारित लोकजीवनाला शेतीचे अर्थकारण सांभाळता आले नाही. परिणामी दिवसेंदिवस शेती आणि शेतकरी यांची स्थिती दयनीय होत चाललीय. त्याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही. अन्नदाता बळीराजा शेती कसतो, म्हणून आम जनतेचे जगणे सुलभ होते; पण सावकारी कर्ज अस्मानी- सुलतानीच्या टाचेखाली हा बळीराजाच जर बळी गेला तर शेतीची माती होईल.. मग उंच टॉवरमध्ये, आलिशान बंगल्यात बसून तुम्ही- आम्ही काय खाणार? हा प्रश्न आहे…

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • pranav garware

    Good to know. More detailed information will be appriciated.

close