…तसा हेतू नव्हता, आबांनी व्यक्त केली दिलगिरी

October 12, 2014 8:20 PM0 commentsViews:

r r patil news312 ऑक्टोबर : गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्‍या उमेदवाराची माहिती लोकांना देण्याचा हेतू होता पण महिलांचा अपमान किंवा बलात्काराला समर्थन करण्याचा कोणताही हेतू नव्हता असा खुलासा राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी केला. तसंच या वक्तव्याबाबत मी दिलगिरीही त्यांनी व्यक्त केली. आर. आर. पाटील यांनी कवठेएकंद इथं केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल निवडणूक आयोगाकडे खुलासा केला.

‘बडे बडे शहरो में छोटे छोटे हादसे होते रहते हैंं असं वक्तव्य केल्यामुळे आर.आर.पाटील यांना गृहमंत्रिपदावरुन पायउतार व्हावे लागले होते. मात्र पुन्हा एकदा आर.आर.पाटील यांनी वादग्रस्त व्यक्तव्य करून निवडणुकीच्या रणधुमाळीत एकच खळबळ उडवून दिली. सांगलीमध्ये कवठेएकंद इथं झालेल्या सभेमध्ये आर.आर.पाटील यांनी भलतीच मुक्ताफळं उधळली. सांगलीत मिरजमधून मनसेकडून सुधाकर खाडे निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहे. कवठेएकंद इथं झालेल्या सभेत आबांनी या उमेदवारावर बलात्काराचे गुन्हे दाखल आहे असं सांगितलं. यांचे समर्थक मला भेटले आणि म्हटले, आबा आमचा पाठिंबा तुम्हाला. म्हटलं का? तर म्हणे आमचा एक उमेदवार तुरुंगात आहे. मी म्हटलं, काय पुण्यकर्म केलं. त्यांनी सांगितलं, त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंद झालाय. मिरजेत अर्ज भरला. जर त्याला इथं उभा राहयचंच होतं, आपल्या तालुक्याचं आमदार व्हायचं होतं तर किमान बलात्कार निवडणुकीनंतर तरी करायचा अशी मुक्ताफळंच आबांनी उधळली. त्यांच्या या वक्तव्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही तीव्र नाराजी व्यक्त करत हे निंदनीय आणि आक्षेपार्ह व्यक्त आहे असं सांगत आबांचे कान उपटले. अखेरीस आबांना निवडणूक आयोगाकडे खुलासा द्यावा लागला. महिलांचा अपमान किंवा बलात्काराला समर्थन करण्याचा कोणताही हेतू नव्हता असं सांगत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close