सेनेवर संकट नाही तर ही संधी -उद्धव ठाकरे

October 12, 2014 9:18 PM0 commentsViews:

uddhav thackaey bkc sabha

12 ऑक्टोबर : ही युती हिंदुत्वाच्या मुद्यावर झाली होती. युती तुटली यांचा मला आनंद नाही त्यांचं दु:ख आणि संतापही आहे. पण शिवसेनेवर आलेलं हे संकट नसून संधी आहे आणि यंदा भगवी दिवाळी साजरी करणार अशी गर्जना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसंच शिवसेनेचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून 50 योजना पूर्ण करणार अशी घोषणा उद्धव यांनी केली. मुंबईत बीकेसी मैदानावर पार पडलेल्या भव्यसभेत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शिवसैनिकांपुढे नतमस्तकही झाले.

शिवसेनेनं आज ‘महाराष्ट्राच्या सुवर्णयुगाची सुरुवात होत आहे, अशा आशयाची जाहिरात प्रसिद्ध करून उद्धव ठाकरे शक्तीशाली महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण घोषणा करणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे काय घोषणा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. त्यामुळे मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्सवर झालेल्या सभेला शिवसैनिकांनी तुफान गर्दी केली होती. या सभेत उद्धव यांनी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली.

राज्याच्या कानोकोपर्‍यात भाजपचे नेते सभा घेत आहेत. पण अशी गर्दी कुणाच्याही सभेला झाली नाही. काही लोकं सभा घेत आहेत आणि त्यासाठी गुजरातमधून बसेस भरून माणसं आणली जात आहे. भाजपच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींना मैदानात उतरावे लागले आहे. त्यांच्यासोबत संपूर्ण केंद्रातलं मंत्रिगट उतरलं आहे राजनाथ सिंह, आनंदीबेन पटेल सगळे जण फिरत आहे. पण याचा काही उपयोग होणार नाही. यांनी युती तोडून जनतेचा विश्वासघात केलाय. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन यांनी ही युती केली होती. ही युती हिंदुत्वाच्या मुद्यावर होती. पण या नेत्यांनी काय सांगून ठेवलं होतं आणि यांनी काय केलं. महायुतीकडे सरकार देण्यासाठी महाराष्ट्र तयार होता पण यांनी भरलेलं ताट नाकारलं. बाळासाहेब असते तर भाजपची हिंमत झाली असती का युती तोडण्याचा ? असा सवाल उद्धव ठाकरेंनी थेट भाजपला विचारला.

यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मोर्चा वळवला. चव्हाण स्वत:ला क्लीन मिनिस्टर समजून घेत होता तर त्यांना राष्ट्रवादीचे गुन्हेगार नेते दिसले नाही का ?, त्यांच्यावर कारवाई का केली नाही ? सिंचनाची फाईल टेबलावर होती तर अजित पवारांवर कारवाई का केली नाही. जर अजित पवारांवर कारवाई केली असती तर अजित पवारांचं जयललितासारखं झालं असतं पण तसं घडलं नाही त्यामुळे चव्हाण हे बिनकामाचे मुख्यमंत्री होते अशी टीका उद्धव यांनी केली.

तसंच आम्ही अगोदरच आमचं व्हिजन डॉक्युमेंट सादर केलं होतं पण भाजपनं ते चोरलं आणि दृष्टिपत्र सादर केलंय असा आरोपही उद्धव यांनी केला. तसंच सत्तेत आल्यावर कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र परत आणणार आणि सुवर्णमहोत्सवी वर्षात 50 योजना पूर्ण करणार अशी घोषणाही उद्धव ठाकरेंनी केली.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे

यंदा भगवी दिवाळी साजरी करणार – उद्धव ठाकरे
जे घडलं त्याचं दु:ख आहे आणि संतापही – उद्धव ठाकरे
संपूर्ण केंद्रातलं मंत्रिपद उतरवलं आहे राजनाथ, आनंदीबेन पटेल सगळे जण फिरत आहे -उद्धव ठाकरे
मी आणखी मर्यादा ओलांडली नाही – उद्धव ठाकरे
ही युती झाली होती हिंदुत्वाच्या मुद्यावर -उद्धव ठाकरे
बाळासाहेब असते तर भाजपची हिंमत झाली असती का युती तोडण्याचा ? -उद्धव ठाकरे
अटलबिहारी वाजपेयी आज जर केंद्रात कारभार सांभाळत असते तर ही युती तुटली नसती – उद्धव ठाकरे
महायुतीकडे सरकार देण्यासाठी महाराष्ट्र तयार होता पण भरलेलं ताट यांनी नाकारलं -उद्धव ठाकरे
भाजपवरील प्रत्येक संकटाचा पहीला वार हा कायम सेनेनं झेललाय -उद्धव ठाकरे
स्वत:ला क्लीन मिनिस्टर समजत असाल तर साबणाच्या जाहिरातीत काम करा -उद्धव ठाकरे
पृथ्वीराज चव्हाण बिनकामाचे मुख्यमंत्री होते -उद्धव ठाकरे
अजित पवारांची जयललिता झाली असती – उद्धव ठाकरे
अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा देण्यासाठी तयार आहे पण एक अट आहे त्यांच्याकडे जाऊन फक्त एक ग्लास पाणी पिऊन यायचं -उद्धव ठाकरे
कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र परत आणल्याशिवाय राहणार नाही -उद्धव ठाकरे
आमचं व्हिजन डॉक्युमेंट भाजपनं चोरलं आणि दृष्टिपत्र सादर केलंय -उद्धव ठाकरे
राजकारणावर न बोलता विकासावर कोणीही बोलाव मी तयार आहे – उद्धव ठाकरे
महिलांची किंमत काय असते यांना काय कळणार कसले हे गृहमंत्री होते ?-उद्धव ठाकरे
वेगळा विदर्भ होऊ देणार नाही -उद्धव ठाकरे
महिलांबद्दल बोलतांना तोंड सांभाळा -उद्धव ठाकरे
राष्ट्रवादीचे अनेक नेते गुन्हेगार असुनही मोकाटच फिरत आहेत – उद्धव ठाकरे
हे संकट नाही तर संधी आहे – उद्धव ठाकरे
काँग्रेस- राष्ट्रवादीने महाराष्ट्र फस्त केला – उद्धव ठाकरे
राज्यात पैसा सापडतोय काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांचा -उद्धव ठाकरे
अजित पवारांच्या गाडीत 4 लाखांची रोकड सापडली हा त्यांचा अपमान -उद्धव ठाकरे
केंद्रात कोणतंही सरकार आलं तरी राज्यातील विकास थांबवू शकणार नाही – उद्धव ठाकरे
मोदींनी विकासाची आश्वासनं दिली म्हणून आम्ही मदत केली -उद्धव ठाकरे
रेल्वेची दरवाढ झाल्यावर शिवसेनेनेच विरोध केला होता – उद्धव ठाकरे
शिवसेनेचा आज वटवृक्ष झालाय, सेनेचं हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे -उद्धव ठाकरे
आम्ही निवडणूक जिंकणारच – उद्धव ठाकरे
मी कुणासमोर झुकणार नाही, वाकणार नाही -उद्धव ठाकरे
प्रत्येक शिवसैनिक बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणासाठी प्रयत्न करतोय -उद्धव ठाकरे
प्रत्येक शिवसैनिक मला प्यारा आहे -उद्धव ठाकरे
शिवसैनिकांचा विश्वासघात करणार नाही -उद्धव ठाकरे
बाळासाहेब म्हणाले होते उद्धव, आदित्यला सांभाळा त्याची आज आठवण होतं आहे – उद्धव ठाकरे
भरसभेत उद्धव ठाकरे झाले शिवसेैनिकांपुढे नतमस्तक
उद्धव ठाकरे शिवसेैनिकांपुढे नतमस्तक
उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे शिवसैनिकांपुढे नतमस्तक
शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात 50 योजना पूर्ण करणार – उद्धव ठाकरे

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close