लोकसभेच्या अध्यक्षपदी महिला मंत्री : मीरा कुमार आणि गिरीजा प्रसाद यांची नावं चर्चेत

May 30, 2009 5:59 PM0 commentsViews: 12

30 मे भारताच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपतीपदी महिला विराजमान झाल्यानंतर आता लोकशाहीतील आणखी एका उच्च पदावर महिलेची नेमणूक होण्याची शक्यता आहे. लोकसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीत मीरा कुमार आणि गिरीजा व्यास यांची नावं आता चर्चेत आली आहेत. महिला आरक्षण विधेयक मार्गी लागण्यासाठी महिला लोकसभा अध्यक्षांची मदत होऊ शक ते म्हणून सोनिया गांधी या मुद्द्यावर आग्रही असल्याचं समजतंय. तर यंदाही लोकसभेचं उपाध्यक्षपद प्रमुख विरोधी असलेल्या एनडीएला देण्याची प्रथा काँग्रेस सुरूच ठेवण्याची शक्यता आहे. सात रेसकोर्समध्ये म्हणजे पंतप्रधानांच्या निवासस्थानी आज कॅबिनेटची जी पहिली बैठक झाली त्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला. यावर शिक्का मोर्तब आता काही तासांतच होणार आहे. लोकसभेच्या अध्यक्षपदी किशोरचंद्र देव यांच्या नावाची चर्चा सुरू होती. पण महिला अध्यक्ष विधायकाच्या दृष्टीने गिरीजा व्यास आणि मीरा कुमार यांची नावं काँग्रेसने पुढे केली आहेत. मीरा कुमार ह्या बिहारमधल्या दलित नेत्या आहेत. लोकसभेच्या अध्यक्षा म्हणून त्यांचंच नाव सर्वात जास्त चर्चेत आहे. त्यांना लोकसभेच्या अध्यक्षा केल्याने बिहारमधली सगळी मायवतींची मतं मीरा कुमारच्या यांच्यामुळे काँग्रेसला मिळणार आहेत. तर भाजप विरोधीपक्ष म्हणून लोकसभेच्या उपाध्यक्षपदासाठी सुमित्रा महजन यांच्या नावाचा भाजप विचार करत आहे. लोकसभेच्या हंगामी सभापतीदासाठी माणिकराव गावित यांची निवड झाली. पंधराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात गावित हे सर्व खासदारांना शपथ देणार आहेत. गावित हे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून सलग नऊ वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. गेल्यावेळी ते केंद्रात गृहराज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. आजच्या पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या संपूर्ण कॅबिनेटच्या बैठकीत तो निर्णय घेण्यात आला. आज मनमोहन सिंग यांच्या संपूर्ण कॅबिनेटची पहिली बैठक झाली. येत्या पाच वर्षांसाठीचा सरकारचा अजेंडा ठरवण्याच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे. एक जूनपासून सुरू होत असलेल्या पंधराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात चार तारखेला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचं अभिभाषण होणार आहे. या अभिभाषणातून सरकारच्या ध्येयधोरणांची माहिती लोकांना मिळते. त्यासाठीचा मसुदा आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. आयबीएन लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रपतींचं अभिभाषण हे काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या धरतीवरच बनवण्यात आलंय. त्यात प्रामुख्याने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, पोलीस खात्यातल्या सुधारणा, सर्व शिक्षा अभियान आणि महिला आरक्षण या मुद्द्यांवर भर देण्यात आला.

close