15 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरूवात

June 1, 2009 7:08 AM0 commentsViews: 1

1 जून15 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला श्रद्धांजलीने सुरूवात झाली. त्यानंतर शपथविधीचा कार्यक्रम सुरू झाला. सगळ्यात पहिल्यांदा प्रणव मुखर्जी यांनी शपथ घेतली. त्यानंतर सभागृहातील विरोधी पक्ष नेते म्हणून लालकृष्ण अडवाणी यांनी शपथ घेतली. अडवाणींनंतर सोनिया गांधी यांनी हिंदीमध्ये शपथ घेतली. भाजप नेत्या सुमित्रा महाजन यांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली. तर सीपीएमचे ज्येष्ठ नेते वासुदेव आचार्य यांनी बंगालीतून शपथ घेतली. या अधिवेशनात नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी, लोकसभा अध्यक्षांची निवड व राष्ट्रपती यांचं अभिभाषण होणार आहे. हे अधिवेशन 9 जूनपर्यंत सुरू राहील. त्यासाठी समिती नेमण्यात आली असून त्यामध्ये कम्युनिस्ट पक्षाचे वासुदेव आचार्य, बिजू जनता दलाचे अर्जुन चरण सेठी, काँग्रेसचे बिरेनसिंग एंगटी आणि भाजपच्या सुमित्रा महाजन यांचा समावेश आहे. यावेळी समितीने नवीन खासदारांना शपथ दिली.

close