विधानसभेत टोलच्या प्रश्नाबाबत बोलू दिलं गेलं नाही – राज ठाकरे

October 13, 2014 10:38 AM1 commentViews:

maharashtra-navnirman-sena-mns-chief-raj-thackeray5

13 ऑक्टोबर : टोलच्या विषयावर भाजपचे नेते एकनाथ खडसे आणि नितीन गडकरी कधी आवाज उठवला नाही. मनसेने आंदोलन केल्यावर 44 टोलनाके बंद झाले, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. विधानसभेत टोलच्या प्रश्नाबाबत बोलू दिलं गेलं नाही या आरोपांचा त्यांनी पुनरुच्चार केला. शिवडी विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्या प्रचारासाठी लालबागमध्ये आयोजित केलेल्या सभेत राज ठाकरे बोलत होते.

विधानसभेत विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे 8-8 तास बोलतात, आणि आमच्या आमदारांना बोलू देत नाहीत असा आरोप करत, आम्ही टोलच्या विषयावर आंदोलनं केली, रत्यावर उतरलो, लाठ्या- काठ्यांचा मार खाल्ला, जेलमध्ये गेल्यावर राज्यातले 44 टोलनाके बंद झाले, तेव्हा कुठे होता हे विरोधीपक्ष? असं राज ठाकरे म्हणाले आहेत. यावेळी राज यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवरही टीका केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Suraj Chavan

    Are kay toll toll kartoys tuzya javal dusra kahi mudda nahi ka. Ani toll kon bhartay jyacha javal 4 wheelar astey. garib manasa kade 4 wheel naste ani tyala toll shi kahi ghena dena nahi. Tuzya Neeta travels la toll bharava lagta manhun tu he andonal kela. Tu manhalas ki nashik Mahanagar palika madhe Munisipal Commisnior nahi tyacha sathi kadi andolan karnar ahes tu.

close