‘हुदहुद’ चक्रीवादळाचा जोर ओसरतोय

October 13, 2014 9:19 AM0 commentsViews:

Cyclone-Hudhud1

13 ऑक्टोबर :  ‘हुदहुद’ चक्रीवादळाचा जोर आता ओसरला आहे. ‘हुदहुद’ चक्रीवादळ रविवारी आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टमण किनारपट्टीवर दुपारी बाराच्या सुमारास धडकलं. त्यानंतर तब्बल सहा तास या वादळाचा जोर ओसरल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केल आहे.

आंध्र प्रदेशातील तीन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि 100 कि. मी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहत आहे. ओडिशालाही चक्रीवादळाचा असाच तडाखा बसला असून दोन्ही राज्यांत 6 नागरीकांचा मृत्यू झाला आहे. ओडिशात एके ठिकाणी दरडी कोसळल्या असून वीज आणि दूरसंचार व्यवस्था कोलमडली आहे. संध्याकाळी सहानंतर या वादळाचा जोर कमी कमी झाला असला तरी याच्या प्रभावामुळे तीन दिवस पावसाची शक्यता असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे.

चक्रीवादळ ‘हुदहुद’चा जोर सोमवारपर्यंत बराच कमी होऊ शकतो; पण त्यामुळे छत्तीसगड, बिहार, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, पश्चिम बंगाल आदी राज्यांत 15 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज आहे. जोरदार पावसामुळे ओडिशामध्ये पुराची शक्यता कायम असल्याचही सांगण्यात येत आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close