‘काँग्रेसने स्कॅम महाराष्ट्र घडवला आम्ही स्कील महाराष्ट्र घडवू’

October 13, 2014 3:00 PM0 commentsViews:

modi in amravati13 ऑक्टोबर : आज प्रचाराचा शेवटचा दिवस. आज सायंकाळी ही प्रचारतोफा थंडावणार आहे. त्याआधी भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळपासूनच प्रचारसभांचा धडाका लावलाय. मोदींची पालघर इंथ पहिली सभा व दुसरी सभा रत्नागिरी येथे झाली. रत्नागिरी येथील सभेत बोलताना मोदींनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय.

काँग्रेसने स्कॅम महाराष्ट्र घडवला आम्ही स्कील महाराष्ट्र घडवू, असे म्हणत कोकणपटट्याचा विकास का झाला नाही, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विकासात मागे का?, याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. हापूस युरोपमधून का परतला? असा प्रश्नही यावेळी उपस्थित केला.

काँग्रेसला आदिवासींचा विसर पडला आहे, अशी टीका मोदींनी काँग्रेसवर केली. या सभेत विकासासंदर्भात बोलताना सुराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असा नवा नारा ही मोदींचा दिला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close