मोदी पंतप्रधानपदाची जबाबदारी पेलू शकणार नाही -पवार

October 13, 2014 4:12 PM4 commentsViews:

pawar on modi_govandi13 ऑक्टोबर : जो पंतप्रधान असतो त्याने देशाबद्दल अगोदर बोललं पाहिजे पण मोदी तसं करत नाही. आज लोकांनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली असली तरी संपूर्ण आयुष्यात पंतप्रधानपदाची जबाबादारी पेलू शकणार नाही अशी खरमरीत टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींवर केली. तसंच मोदी राज्यात राष्ट्रवादीविरोधात चुकीचा प्रचार करत आहे असा आरोपही पवारांनी केला. ते गोवंडीत बोलत होते.

विधानसभेच्या प्रचाराच्या आखाड्यात मोदी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामनाच रंगलाय. मोदींनी थेट राष्ट्रवादीवर संधान साधत राष्ट्रवादी भ्रष्टचारावादी पक्ष आहे अशी घणाघाती टीका केली होती. मुंबईमध्ये गोवंडी इथं रविवारी झालेल्या सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. आज सगळ्यात मोठा चिंतेचा विषय हा आहे की, देशाचे पंतप्रधान इथं येऊन महाराष्ट्राला गुजारतच्या पुढे नेऊन जाण्याची भाषा करताय. मोदी असाही दावा करतात की, गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे महाराष्ट्राचे नुकसान झाले असून महाराष्ट्र मागे पडला आहे. पण मी मोदींना एवढंच विचारू इच्छिते की, देशाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे, तुमचं पंतप्रधान कार्यालय देशातील सर्व क्षेत्रातील माहिती ठेवत असतो. तुम्ही तिथे एकदा जाऊन महाराष्ट्र आणि गुजरातची तुलना करावी त्यामुळे तुम्हाला कळेल की महाराष्ट्र सर्वात पुढे आहे असा सल्लावजा टोला पवारांनी लगावला. पुढे ते म्हणाले, जो पंतप्रधान असतो त्याने देशाबद्दल बोललं पाहिजे ते फक्त राज्याबद्दल बोलत असतील तर योग्य नाही. त्यांनी देशाबद्दल अगोदर बोललं पाहिजे. लोकांनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली असली तरी संपूर्ण आयुष्यात ही जबाबादारी पेलू शकणार नाही असंही ते म्हणाले. तसंच मोदी आज राज्यात येऊन राष्ट्रवादीबद्दल चुकीची माहिती देत आहे त्यामुळे त्यांना सडेतोड उत्तर देण्याची गरज आहे ते तुम्ही 19 तारखेच्या निकालातून दाखवून द्या असं आवाहनही पवारांनी केलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Yuvraj Kadam

  sharad pawar la swatala primeminister hota ale nahi yache dukha salte ahe.

 • Suraj Chavan

  Loksabhechya velis tu manhat hota Modi mala pelu sakat nahi pan pellana tula mug ata vishansabhe madhe pan tula pelnar. vakad tondya

 • rahul

  tond bagh swatacha pahile..brashtachar cha badshaa

 • nilesh

  Jewha swatahala PM bananyachi sandhi ali hoti tewha swatahacha paksha banawun side role karat basale. Sonia la oppose karun wegali party banawali ani shewati Congresshich haat milawala. Tumchyat ti takat hoti pan wapar karu shakale nahi.

close