प्रचार तोफा थंडावल्या, बुधवारी मतदान

October 13, 2014 8:54 PM0 commentsViews:

prachar tofa634613 ऑक्टोबर : टीका, आरोप-प्रत्यारोप एवढंच नाहीतर आमचीच सत्ता येणार…एकदा हातात सत्ता द्या…विकास करून दाखवतो अशा आश्वासनाचा पाऊस पडला आणि आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या. संध्याकाळी पाच वाजता प्रचाराची सांगता झाली. आता खरी परीक्षा ही बुधवारी असणार आहे. 15 ऑक्टोबरला मतदान आणि 19 तारखेला जनतेचा फैसला कळणार आहे त्यामुळे अवघ्या देशाचे लक्ष आता महाराष्ट्राकडे लागले आहे.

यंदा सर्वच पक्ष स्वबळावर मैदानात उतरल्यामुळे विधानसभेची निवडणूक ऐतिहासिक ठरलीये. गेल्या 25 वर्षांची शिवसेना आणि भाजपची युती तुटली आणि त्यापाठोपाठ काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा 15 वर्षांचा संसारही मोडला. स्वबळावर सगळेच पक्ष मैदानात उतरले त्यामुळे लढत ही पंचरंगी होणार आहे. प्रचारातही हे युद्ध पाहण्यास मिळालं. भाजपचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारात उडी घेतल्यामुळे निवडणुकीला वेगळं महत्व मिळालं. एकीकडे प्रचाराचा धुरळा उडत होता तर दुसरीकडे पैसा आणि दारूचा महापूर आला होता. राज्यात ठिकठिकाणी कोट्यवधीची रोकड पकडली गेली. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक उमेदवारांवर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल झाले आहे. आता येत्या बुधवारी 15 ऑक्टोबरला मतदान होणार आहे आणि रविवारी 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे त्यामुळे मतदारराजा कुणाच्या हातात सत्तेच्या चाव्या देतो हे पाहण्याचं ठरणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close