मोदींची स्तुती भोवली, शशी थरूर यांची हकालपट्टी

October 13, 2014 9:15 PM1 commentViews:

shashi tharoor13 ऑक्टोबर : काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांना काँग्रेसच्या प्रवक्तेपदावरून हटवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केल्यामुळे शशी थरूर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

या आधीही काँग्रेस पक्षाने शशी थरूर यांना मोदींचे गुणगान न गाण्याचा इशारा दिला होता. मात्र थरूर यांनी अनेक वेळा पंतप्रधान मोदींचे ट्विटरवरून कौतुक केल्याचे आढळले. मोदींनी आपल्या स्वच्छता अभियानात शशी यांना आमंत्रित केले होते, त्यानंतर लगेचच ” मोदींच्या आमंत्रणाचा स्विकार करताना मी स्वत:ला धन्य मानतो.” अशी थरूर यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली.

थरूर यांनी याआधीही मोदींच्या संयुक्त राष्ट्र महासभेतील भाषणाचे कौतुक केले होते. अनेकदा चेतावनी देऊनही थरुर हे मोदींचे गुणगान गातच होते. तेव्हा केरळ काँग्रेसने, पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे थरूर यांना हटविण्याची मागणी केली होती. सोनिया गांधींनी मागणी मान्य केली व अखेर शशी थरूर यांची प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Rajaram Khanolkar

    Modiji on Cleanliness Drive…all corrupt people, murderers, thieves,…join hands with Modi…all your sins will be cleaned!!!!!

    Guaranteed Results!!!!…Don DP Yadav, corrupt YeDiyurappa, tainted Gabhit, tainted Pachpute, murderer & extortionist Kardille, more than 70 corrupt candidates imported from NCP, doubtful Shashi Tharoor, and now brother of Chhotta Rajan….are already in queue….join fast.

close