हा ठरला जनतेचा जाहीरनामा, वाचा नेटिझन्सचा कौल

October 13, 2014 10:55 PM8 commentsViews:

ibnlokmat_jantecha jahirnama13 ऑक्टोबर : ‘तुम्ही ठरवा तुमचा जाहीरनामा…तुमचा जाहीरनामा ठरेल जनतेचा जाहीरनामा’असं आवाहन आम्ही वाचकांना केलं होतं. वाचकांनी आपली परखड मत नोंदवत आमचा वेबसाईट पोल डोक्यावर घेतला. जाहीरनाम्यांच्या लोकप्रियतेचा कौल आणि ट्रेंड जाणून घेण्याचा हा प्रयत्न होता…या ट्रेडिंगमध्ये बाजी मारलीय ती शिवसेनेच्या वचननाम्यानं…वाचकांनी शिवसेनेचा जाहीरनामा अर्थात वचननामा सर्वोत्कृष्ट ठरवतं आपला कौल दिला. 33 टक्के वाचकांनी शिवसेनेचा वचननामा ठरवलाय ‘जनतेचा जाहीरनामा’ त्यापाठोपाठ मनसेची ब्ल्यू प्रिंटही वाचकांना भावलीये. सेनेच्या वचननाम्यानंतरची वाचकांची दुसरी पसंती ही मनसेच्या ब्ल्यू प्रिंटला म्हणजेच विकासाच्या आराखड्याला मिळाली आहे. मनसेच्या ब्ल्यू प्रिंटला वाचकांनी दिलीयत 26 टक्के मतं.

हे झालं जाहीरनाम्याबद्दल…पण कोणता पक्ष दिलेल्या जाहीरनाम्यांची उत्तम पूर्तता करू शकतो? असाही सवाल आम्ही वाचकांना विचारला होता तर इथं 37 टक्के वाचकांनी शिवसेना आपल्या जाहीरनाम्याची उत्तम पूर्तता करू शकेल, असा कौल दिलाय. तर 25.7 टक्के नेटिझन्सनी मनसेवर जाहीरनामा पूर्ततेसाठी विश्वास दाखवलाय. शिवसेना आणि मनसेनंतर वाचकांनी भाजपच्या ‘दृष्टिपत्र’ म्हणजे जाहीरनाम्याला पसंती दिली. पण नेटिझन्सच्या या ट्रेंडनुसार, जाहीरनाम्यासाठी भाजप तिसर्‍या स्थानावर आहेत. तर 15 वर्ष सत्तेत असणारे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष चक्क अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर फेकले गेले आहेत.

वचननामे, ब्ल्यू प्रिंट, दृष्टीपत्र आणि जाहीरनाम्यांच्या प्रसिद्धीनंतर यामधील आश्वासनांविषयी आम्ही प्रेक्षक आणि वाचकांची मतं ऑनलाईन जाणून घेतली. हा कोणताही पोल नाही…नेटिझन्सचा जाणून घेतलेला ट्रेंड आहे. या जनतेच्या जाहीरनाम्यासाठी 26 हजार 700 वाचकांचे मत सॅम्पल म्हणून वापरली..वाचकांनी दिलेल्या या उदंड प्रतिसादाबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद..

असा झाला वेबसाईटवर पोल

निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक राजकीय पक्ष जाहीरनामे काढतात. पण किती पक्ष त्या आश्वासनांची पूर्तता करतात ? त्यामुळे आम्ही आमच्या आयबीएन लोकमतच्या वेबसाईटवर एक पोल घेतला होता. ज्यात तुम्ही मतदान करुन तुमचा जाहीरनामा तयार केला आहात. प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यातील दहा महत्वाचे मुद्दे आम्ही काढले आणि त्यानुसार तुम्ही कोणत्या पक्षाचा जाहीरनामा उत्तम आहे हे ठरवलं आहे. तब्बल 26 हजार 700 वाचकांनी आपली मत इथं नोंदवलीये.

नेटिझन्सचा कौल
 
यंदाच्या निवडणुकीत सर्वोत्कृष्ट जाहीरनामा कोणत्या पक्षाचा आहे?
- काँग्रेस: 3.6 टक्के
- राष्ट्रवादी: 17.8 टक्के
- शिवसेना: 33.2 टक्के
- भाजप: 18.6 टक्के
- मनसे: 26.7 टक्के

ऐन निवडणुकीच्या तोंडावर आलेले जाहीरनामे राजकीय पक्ष गांभीर्यानं घेतात का?
- होय: 22.2 टक्के
- नाही: 52.9 टक्के
- सांगू शकत नाही: 24.9 टक्के

कोणता पक्ष दिलेल्या जाहीरनाम्यांची उत्तम पूर्तता करू शकतो?
- काँग्रेस: 2%
- राष्ट्रवादी: 11.8%
- शिवसेना: 37.1%
- भाजप: 23.3%
- मनसे: 25.7%

पोलमध्ये कोण ते होते मुद्दे ज्यावर ठरला जनतेचा जाहीरनामा ?

 1) गृहनिर्माण / नागरीकरण

- भाजप : राज्यात 10 स्मार्ट शहरांची स्थापना - 26.8 टक्के
- राष्ट्रवादी : विधवा-निराधार महिलांसाठी विशेष योजना, ग्रामीण भागासाठी यशवंतराव चव्हाण घरकुल योजना - 10.3 टक्के
- शिवसेना : नवं गृहनिर्माण धोरण, SRA योजना संपूर्ण राज्यात राबवणार - 28.9 टक्के
- काँग्रेस : गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नाला प्राधान्य देणार – 3.1 टक्के
- मनसे : प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र गृहनिर्माण मंडळ आणणार, SRA योजनेची नियोजनबद्ध अंमलबजावणी - 30.9 टक्के

 2) पायाभूत सुविधा / वीज

- भाजप : नवीन एक्स्प्रेस हायवे बांधणार/ नवीन ऊर्जा धोरण तयार करणार, नवऊर्जा योजना राबवणार - 25 टक्के
- राष्ट्रवादी : राज्याच्या ऊर्जेची गरज लक्षात घेऊन ऊर्जा धोरण तयार करणार - 7 टक्के
- शिवसेना : ट्रान्स हार्बर लिंक, सागरी वाहतूक प्रकल्प राबवणार / नवीन विद्युत प्रकल्प उभारणार / शिवप्रकाश योजनेद्वारे सौरऊर्जेचा वापर – 35 टक्के
- काँग्रेस : अपारंपरिक स्रोतांपासून वीजनिर्मिती संस्थांना सहाय्य, मुंबई आणि उपनगरात समान वीजदर - 5 टक्के
- मनसे : पथकर धोरणात पारदर्शकता आणणार, खुल्या बाजारात वीज विक्रीला प्रोत्साहन - 28 टक्के

 3) उद्योग / रोजगार

- भाजप : गुंतवणुकीसाठी ‘डेस्टिनेशन महाराष्ट्र’ नवी योजना, ‘मेक इन महाराष्ट्र’ प्रकल्प -25.7 टक्के
- राष्ट्रवादी : ज्या शहरात LBT लागू तो रद्द , उद्योगांना मालमत्ता करात सूट - 8.9 टक्के
- शिवसेना : स्वयंपूर्ण औद्योगिक नगरांची स्थापना, तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी - 32.7 टक्के
- काँग्रेस : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना – 3 टक्के
- मनसे : राज्याचं स्वतंत्र व्यापार धोरण, जिल्हा पातळीवर रोजगार-व्यवसाय सहाय्य केंद्र उभारणार - 29.7 टक्के

4) कायदा-सुव्यवस्था

- भाजप : पोलीस कर्मचार्‍यांची संख्या वाढवणार, महिला पोलिसांची भरारी पथकं - 21.6 टक्के
- राष्ट्रवादी : पोलीस कर्मचार्‍यांच्या हक्काच्या घरांसाठी जागा - 6.2 टक्के
- शिवसेना : वर्षभरात पोलीस खात्यातील सर्व रिक्तपदांची भरती, महिलांसाठी विशेष न्यायालयाची स्थापना -33 टक्के
- काँग्रेस : महिला पोलीस स्टेशन्स उभारणार – 2.1 टक्के
- मनसे : पोलीस व्यवस्थेत आमूलाग्र बदल, पोलीस दलाचं विकेंद्रीकरण – 37.1 टक्के

 5) तरुण / महिला

- भाजप : ‘माहेरचा आधार’ मासिक पेन्शन योजना, महिला सुरक्षा ऑडिट करणार - 27.7 टक्के
- राष्ट्रवादी : महिलांसाठी 33% आरक्षण, प्रमुख मार्गांवर महिलांसाठी विशेष बसेसची सोय / तरुणांसाठी रोजगार निर्मितीचं धोरण – 7.9 टक्के
- शिवसेना : महिला सुरक्षेसाठी महिला पोलिसांची भरती -29.9 टक्के
- काँग्रेस : जनश्री पेन्शन योजना, कॉलेजमध्ये ‘स्व- संरक्षण’ विषय सक्तीचा करणार - 3 टक्के
- मनसे : जि.प. शाळेतील मुलींना मोफत सायकल, प्रत्येक शाळेत मुलींसाठी स्वच्छतागृह - 31.7 टक्के

 6) पाणीपुरवठा / ग्रामविकास

- भाजप : समन्यायी पाणीवाटप करणार, खोरेनिहाय जलसिंचन योजना राबवणार -24 टक्के
- राष्ट्रवादी : स्थानिक स्वराज्य संस्थांचं बळकटीकरण, घर तिथं शौचालय योजना राबवणार - 7 टक्के
- शिवसेना : ग्रामीण बांधवांचं जीवन सुसह्य करणार्‍या सात नव्या योजना - 35 टक्के
- काँग्रेस : प्रत्येक गाव पक्क्या रस्त्यांनी जोडणार - 3 टक्के
- मनसे : महाराष्ट्र राज्य पाणी देखरेख लवाद निर्माण करणार - 31 टक्के

7) कृषी / सिंचन

- भाजप : अन्नदाता आधार पेन्शन योजना, कृषी उत्पादन सुरक्षा निधीची निर्मिती -20.6 टक्के
- राष्ट्रवादी :अल्प भूधारक शेतकर्‍यांना ट्रॅक्टर, इतर अवजारे खरेदीसाठी अनुदान - 8.2 टक्के
- शिवसेना : शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प, शेतकर्‍यांच्या मदतीसाठी इंद्रधनुष्य योजना - 37.1 टक्के
- काँग्रेस : कृषी ग्राहकांना दिवसा 8 तास, रात्री 10 तास वीजपुरवठा, दुष्काळप्रवण जिल्ह्यांसाठी कायमस्वरूपी दुष्काळ निवारण निधी -2.1 टक्के
- मनसे : पाणी वापराचं प्राधान्यक्रम ठरवणार, दुष्काळी भागात पाणी वापराचे कडक नियम - 32 टक्के

 8) दलित / अल्पसंख्याक

- भाजप : आदिवासींसाठी सौरकंदील देण्याची अंधारमुक्ती योजना, पाणी शुद्धीकरणासाठी फिल्टर्स -23.5 टक्के
- राष्ट्रवादी : रमाई घरकुल योजनेचं उद्दिष्ट दुप्पट करणार, राज्यात लेदर टेक्नॉलॉजी पार्क - 7.8 टक्के
- शिवसेना : मागासवर्गीयांच्या विकासासाठी वाढीव आर्थिक तरतूद - 31.4 टक्के
- काँग्रेस : अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट – 3.9 टक्के
- मनसे : आदिवासी स्वशासन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी – 33.3 टक्के

 9) आरोग्य / शिक्षण

- भाजप : प्राथमिक आरोग्य केंद्र बळकट करणार / मराठी शाळा आर्थिक सबलीकरण योजना राबवणार - 27 टक्के
- राष्ट्रवादी : ‘ब्लड ऑन कॉल’ सेवेचा विस्तार, कॉलेजमधील ग्रंथालयं डिजिटल करणार – 8 टक्के
- शिवसेना : इंद्रधनुष्य योजनेअंतर्गत प्रगत शिक्षणावर भर, तालुका पातळीवर निदान केंद्र उभारणार - 28 टक्के
- काँग्रेस : आम आदमी विमा योजना, कॉलेजमध्ये वाय-फाय सुविधा - 2 टक्के
- मनसे : प्रत्येकाला आरोग्य विमा / शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करणार – 35 टक्के

10) संस्कृती / क्रीडा -

- भाजप : अरबी समुद्रात शिवरायांचं भव्य स्मारक, डिजिटल मराठी प्रोत्साहन योजना -21 टक्के
- राष्ट्रवादी : स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त 55 वर्षांवरच्या खेळाडूंना दरमहा पेन्शन -8 टक्के
- शिवसेना : कला, नाट्य क्षेत्राशी संलग्नता / तळागाळातल्या तरुणांपर्यंत क्रीडा प्रशिक्षण केंद्राची सोय -30 टक्के
- काँग्रेस : जिल्हास्तरावर ग्रंथोत्सवाचं आयोजन, राज्यात 1 मे ते 15 मे मराठी संवर्धन पंधरवडा - 2 टक्के
- मनसे : किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धन महामंडळ स्थापणार -39 टक्के

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • vishal magar

  MNSche Blue Print khup mast ahe.ane te shkye pan ahe.

 • VIJAY MOHARIR

  BJP and PM Modi is fooling people by promising house to all indians by 2022. the party should have submitted yearly targets and submit how they are fulfilling the dream.

 • xyz

  mns is leading in 6 categories out of 10.

 • xyz

  mns is leading in 6 out of 10 categories

 • amit burte

  jay shivsena …

 • Sarang kadam

  Saglya pakshani aple jahirname prasidha kele ahet pan tyachi purtata karnyat konachi hi kuvat nahi ahe .sagle sale bolbachan. Pan ek paksha asa ahe ki jo tyajya vachannamchi vachane purna karu shakto toh mhanje” Uddhav Thakarey “hyancha ” Shiv – Sena ” paksha. Dont divide Marathi votes lates vote for ” Shiv – Sena “.

 • ashvin patil

  Shiv sena aani MNS cha khup changala dustikon aahe . bhajapa ne shetkaryala kahihi dilele nahi

 • bhagwat

  Only sena

close