मतदारराजाला भरपगारी सुट्टी!

October 14, 2014 1:12 PM0 commentsViews:

43mumbai_election_n

14 ऑक्टोबर :  विधानसभा निवडणुकीसाठी उद्या 15 ऑक्टोबरला होणार्‍या मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक आयोगातर्फे अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यापार्श्वभूमीवर मतदानासाठी भरपगाकी सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे.

राज्यातील कोणताही उद्योग- धंदा, औद्योगिक उपक्रमांमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना दिलेल्या सुट्टीच्या बदल्यात पगारातून कोणतीही रक्कम कापली जाणार नाही. रोजंदारीवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांनाही भरपगारी सुट्टी मिळणार आहे.कोणताही मालक किंवा औद्योगिक संस्था कर्मचार्‍यांना सुट्टी देणार नाही किंवा पगारातून निवडणुकीच्या सुट्टीची रक्कम वजा करेल त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. तर ज्या उद्योगांतील कामगारांना सुट्टी देणं शक्य नाही, त्यांना मतदानासाठी पुरेसा अवधी देण्यात यावा, असंही आयोगाने स्पष्ट केलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close