पप्पू कलानीची जन्मठेपेची शिक्षा कायम

October 14, 2014 1:45 PM0 commentsViews:

kalani-300x25814 ऑक्टोबर : उल्हासनगरमध्ये 24 वर्षांपूर्वी इंदर भटिजा हत्येप्रकरणी दोषी ठरवलेल्या माजी आमदार आणि उल्हासनगर महापालिकेचे नगरसेवक पप्पू कलानीची जन्मठेप उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.

कल्याण सत्र न्यायालयाने 03 डिसेंबर 2013 रोजी पप्पू कलानीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. याविरोधात कलानीने मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र कोर्टाने त्याची याचिका फेटाळत कल्याण सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close