बिरदेव यात्रेचा उत्साह

October 14, 2014 2:52 PM0 commentsViews:

14 ऑक्टोबर :  कोल्हापूर जिल्ह्यातल्या पट्टणकोडोली इथं विठ्ठल बिरदेव यात्रा उत्साहात पार पडली. शनिवारी या मंदिरामध्ये फरांडे बाबांचं आगमन झालं होतं आणि त्यानंतर पारंपारिक पद्धतीनं भंडारा उधळत या मंदिरामध्ये भाकणूक पार पडली.

यावेळी मंदिरामध्ये हेगडी आणि बोत्यांचा नैैवेद्य दिला गेला. तर धनगरी ढोलांच्या तालावर गोंधळनृत्यही यावेळी पार पडलं. गेल्या 10 दिवासंपासून या यात्रेला सुरुवात झाली होती. आज या यात्रेत भर यात्रेचा दिवस अशून त्यानंतर बुधवारी आराधना आणि प्रसाद वाटप करुन यात्रेची सांगता होणाराय. यावेळी यात्रेच्या निमित्तान पट्टणकोडोलीमध्ये लाखो भाविक दाखल झाले होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close