अमेरिकेतल्या जनरल मोटर्सची दिवाळखोरी कायदेशीररित्या जाहीर

June 1, 2009 1:20 PM0 commentsViews: 2

1 जून अमेरिकेतली बडी ऑटो कंपनी जनरल मोटर्सनं आज कंपनीची दिवाळखोरी कायदेशीररित्या जाहीर केलीय. अमेरिकेच्या इतिहासात एखाद्या इतक्या मोठ्या कंपनीने दिवाळखोरी जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या 100 वर्षं जुन्या कंपनीच्या कामगिरीत गेल्या 30 वर्षांत सतत घसरण झाली आहे आणि अखेर कंपनीवर दिवाळखोरी दाखल करण्याची वेळ आली आहे. या कंपनीवर आता अमेरिकन सरकारचा ताबा असेल. जीएमला 30 अब्ज डॉलर्सची मदत मिळणार आहे. पण जीएमच्या दिवाळखोरीचा सगळ्यात मोठा फायदा होईल तो टोयोटा, होंडा, निस्सान आणि ह्युंडाईसारख्या स्पर्धक कंपन्यांना हे मात्र निश्चित.

close