मंदीमुळे देशाच्या निर्यातीत घसरण

June 1, 2009 1:42 PM0 commentsViews: 5

1 जून जगभरातल्या मंदीचा परिणाम देशाच्या निर्यातीवर होतो आहे. लागोपाठ 7 व्या महिन्यात एक्स्पोर्ट्समध्ये घसरण झाली आहे. मागच्या वर्षी एप्रिलच्या तुलनेत यावर्षी 33 टक्के कमी निर्यात झाली. या महिन्यात 10.74 अब्ज डॉलर्सचीच निर्यात झाली आहे. तर दुसरीकडे आयातीतही घसरण पाहयला मिळते आहे. एप्रिल 2008 च्या तुलनेत या एप्रिलमध्ये आयात 37 टक्के कमी झाली. उद्योगांमधल्या मंदीमुळे आयात कमी झाल्याचं मानण्यात येत आहे.ऑईल इम्पोर्ट्स सगळ्यात जास्त म्हणजे 58 टक्क्यांनी कमी झाले आहेत.

close