मतदारराजा तुझ्यासाठी काय पण, गुलाब देऊन होणार स्वागत !

October 14, 2014 7:18 PM0 commentsViews:

voter314 ऑक्टोबर : मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या दारावर सुंदर रांगोळी, गुलाबपुष्प देवून जर तुमचं स्वागत झालं तर….मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोग हा अनोखा उपक्रम उद्या मतदानाच्या दिवशी हाती घेतला आहे. यासाठी मुंबईतील कुलाब्यापासून ते धारावीपर्यंतच्या 10 मतदार संघातल्या 18 मतदान केंद्रांवर प्रायोगिक तत्वावर ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेनुसार मतदान केंद्राची स्वच्छता करण्यात येणार आहे. मतदानकेंद्रासमोर आकर्षक रांगोळी काढण्यात येणार आहे, तर सकाळी मतदानासाठी येणार्‍या मतदारांचं गुलाबाचं फुल देवून स्वागत करण्यात येणार आहे. तेव्हा उद्या सर्वांनी मोठ्या संख्येनं मतदानासाठी बाहेर पडावं असं आवाहन निवडणूक आयोगानं केलंय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close