पुण्याजवळ सुखोई विमान कोसळले

October 14, 2014 8:11 PM0 commentsViews:

pune sukhoi14 ऑक्टोबर : पुणे जिल्ह्यातील येऊरजवळ आज (मंगळवारी) भारतीय वायु दलाचे सुखोई विमान अपघातग्रस्त झाले आहे. कोलवडी शिवारात दुपारी प्रशिक्षण विमान कोसळले. या अपघातात विमानाचा चक्काचूर झाला असला तरी वैमानिकांनी प्रसंगावधान राखून उड्या मारल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. येऊरपासून कोलवडी इथं हे विमान कोसळलं. विमानावरचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडला. वैमानिकांनी वेळीच पॅराशुटच्या साहाय्याने उड्या मारल्या त्यामुळे ते सुखरूप बचावले. अपघातस्थळी वायु दलाचे बचाव पथक पोहचले असून मदतकार्य सुरू आहे. या अगोदर मागील वर्षी डिसेंबर महिन्यात सुखोईचे विमान पुण्याजवळ वाघोली भागात कोसळले होते. त्यानंतर सुखोई विमान कोसळल्याची ही दुसरी घटना आहे. आतापर्यंत मिग विमानांना अपघात होत होता. त्यामुळे आता सुखोई सारख्या अत्याधुनिक विमानांनाही अपघात झाल्याने वायुदलाच्या लढाऊ विमानांच्या विश्वासहर्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिला आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close