भांडुपमध्ये दीड लाखांच्या बनावट नोटा जप्त

October 14, 2014 10:17 PM0 commentsViews:

fake_nota_bhandup14 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचा सुळसुळाट झालेला दिसून येत आहे. मुंबईतील भांडुप इथं 1 लाख 70 हजारांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. भांडुप पोलिसांनी आज (मंगळवारी) भांडूप येथील भट्टीपाडा विभागातून 3 जणांना ताब्यात घेतल आहे. त्यांच्याकडून 1 लाख 70 हजारांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत. निवडणुकाच्या वेळी मतदारांना पैशांचे वाटप करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बनावट नोटांचा वापर करण्यात येतोय या माध्यमातून बनावट नोटा चलनात आणल्या जाऊ लागल्या आहे. 1 लाखांच्या नोटा या 50 हजारात घेतल्या जातात आणि त्या चलनात आणण्यासाठी हस्तकांमार्फत बाजारात आणल्या जातात. या नोटांचं राजकीय कनेक्शन आहे का ? याची कसून चौकशी पोलीस करत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close