पैसे वाटप प्रकरणी अपक्ष उमेदवार शिरीष चौधरींवर गुन्हा दाखल

October 14, 2014 10:00 PM0 commentsViews:

shrish chodhari14 ऑक्टोबर : अमळनेर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल पाटील प्लाझामध्ये 11 तारखेला पोलिसांनी धाड टाकली होती त्यात जगदीश चौधरी आणि योगेश चौधरी यांच्याकडे 80 लाखाची रक्कम आढळून आली होती त्यांचा संबंध उमेदवार शिरीष चौधरी यांच्याशी पोलीस तपासात स्पष्ट झाल्यामुळे अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे अमळनेर मध्ये एकाच खळबळ उडाली, जगदीश चौधरी आणि योगेश चौधरी यांनी जमीन खरेदीसाठी रक्कम आणल्याच जबाबात म्हटलं होत तसं पोलिसांना तपासात कुठही आढळून न आल्यामुळे ही 80 लाख रुपयांची रक्कम मतदारांना आमिष दाखविण्यासाठीच आणली होती हे स्पष्ट झालं.

त्यामुळे लोकप्रतिनिधी 1951 चे कलम 123 (ख) हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, याच प्रकरणावरून काल शिरीष चौधरी यांचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. या प्रकरणात एका कारची तोडफोड करण्यात आली होती. यामुळे रात्री शहरात तणावाचं वातावरण होतं. या प्रकरणी दोन्ही उमेदवारांकडच्या 60 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close