आतापर्यंत कुणी कुणी केलं मतदान…पाहा फोटो गॅलरी

October 15, 2014 9:50 AM0 commentsViews:

ajit_pawar_sule_fadanvis_voting

15 ऑक्टोबर : आज दिवस मतदानाचा…सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. दुपारच्या उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी अनेक जण सकाळीच घरातून बाहेर पडले आहे. सर्वच उमेदवार आणि सेलिब्रिटींनी नेहमीप्रमाणे मतदानाचा हक्क बजावला आहे. बारामती काटेवाडीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. तर सुप्रिया सुळे यांनी ही बारामतीत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी सुप्रियांनी आपला सेल्फी फोटो काढण्याचा मोह टाळता आला नाही. भाजपचे नेते विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस यांनी मतदान केलंय. तर ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार रेखा यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांच्यापाठोपाठ जया बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी मतदान केलं..

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close