अटलांटिक महासागरावर भरकटलेलं विमान कोसळलं – एअर फ्रान्सची माहिती

June 1, 2009 4:39 PM0 commentsViews: 3

1 जूनब्राझीलमध्ये अटलांटिक महासागरावर भरकटलेल्या एअर फ्रान्सचं विमान कोसळल असल्याची माहिती एअर फ्रान्सने दिली आहे. या विमानात 228 प्रवासी आणि 18 कर्मचारी होते. विमानातले 228 प्रवासी ठार झाल्याची भीती आहे. रिओ दे जानेरोहून हे विमान पॅरिसला जात होतं. हा प्रवास अकरा तासांचा होता. त्याचवेळी ब्राझीलच्या किनारी भागात या विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. अटलांटिक महासागरावरून उड्डाण करत असताना तिथल्या नॉन रडार झोनमध्ये आल्यावर हे विमान बेपत्ता झालं. त्यानंतर विमानात शॉर्ट सर्कीट झाल्याचा ऑटोमेटिक संदेश विमानाने पाठवला. विमानाला विजेचा धक्का बसला असावा, अशी शक्यता एअर फ्रान्सच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.

close