पाटण्याजवळ संतप्त प्रवाशांनी पेटवल्या तीन ट्रेन

June 1, 2009 4:46 PM0 commentsViews: 23

1 जूनरेल्वेमंत्री बदलल्यापासून बिहारवर अन्याय होत असल्याचा आरोपावरून पाटण्याजवळ संतप्त प्रवाशांनी तीन ट्रेन पेटवल्या. बिहारमध्ये श्रमजिवी एक्प्सप्रेसचे काही थांबे बंद करण्यात आल्याचा संताप या प्रवाशांच्या मनात होता. त्यामुळे जमावाला पाटणा रेल्वे स्टेशनजवळ तीन रेल्वेगाड्यांना आग लावण्यास कारण मिळालं. खुसरोपूर आणि फतुहा स्टेशनवर या घटना घडल्या. आज सकाळी आंदोलकांनी इंटरसिटी एक्सप्रेसचे चार डबे पेटवले. तसंच रेल्वे ट्रॅकही उखडले. छोट्या स्टेशनवरचे थांबे रद्द करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिलेत. हे आदेश मागे घेतल्याचे इस्टर्न रेल्वेने सांगितलं. पण रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांना त्याचा इन्कार केला आहे. या रेल्वेगाड्या पेटवण्याच्या घटनांमुळे माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव आणि ममता बॅनर्जी यांच्यात आता राजकारण सुरू झाल्याचं दिसत आहे.

close