हाफिज सईदला लाहोर हायकोर्टाने दिले सुटकेचे आदेश

June 2, 2009 8:40 AM0 commentsViews: 5

2 जूनजमात उद दावाचा प्रमुख हाफिज सईदला लाहोर हायकोर्टानं सोडण्याचे आदेश दिले आहेत. हाफिजची नजरकैद बेकायदा असल्याचं लाहोर कोर्टानं म्हटलंय. तसंच हाफिजविरुद्द पुरेसे पुरावे सादर करण्यात आले नसल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं. त्यामुळे जवळपास सहा महिने नजरकैदेत ठेवण्यात आल्यानंतर हाफिजची नजरकैदेतून सुटका करण्यात आली आहे. पाकिस्तान सरकारने दिलेले पुरावे पुरेसे नसल्याचं मत लाहोर हायकोर्टाने नोंदवलं आहे. दरम्यान हाफिजच्या सुटकेचा मुंबई हल्ल्याच्या चौकशीवर कुठलाही परिणाम होणार नाही असा दावा केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी केलाय.26/11च्या मुंबई हल्लाप्रकरणी हाफिज मुख्य आरोपी आहे. या दहशतवादी हल्ल्यात हाफिजचा हात असल्याचं मानलं जात आहे. हाफिज सय्यद मुंबई हल्ल्यातला मास्टरमाईंड असून त्याने 26/11च्या दहशतवाद्यांना सर्व साधनसामग्री पुरवली. याशिवाय हाफिजने मुझफ्फराबाद, पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातल्या दहशतवादी प्रशिक्षण केंद्राशी संबंधित प्रशिक्षणादरम्यान त्यानं कसाबची भेट घेतली, त्यांना हल्ल्यासाठी उद्युक्त केलं. शोधात असलेल्या 35 अतिरेक्यांपैकी हाफिज सय्यद एक अतिरेकी आहे. हायकोर्टाने त्याला सोडण्याचे आदेश दिले असले तरी त्याचा खटला अजूनही हायकोर्टात सुरू असून हाफिजने कोर्टाकडे केलेल्या जामिनाची मागणी अजूनही प्रलंबित आहे.

close