आजपासून मुंबई सेंट्रल ते वरळी भागात दोन दिवस पाणी पुरवठा बंद

June 2, 2009 9:05 AM0 commentsViews: 9

2 जून मुंबई सेंट्रल ते वरळी भागात आजपासून दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. वांद्रे ते माहीम भागात5 व्या आणि 6 व्या रेल्वेमार्गाचं काम सुरु आहे. त्यामुळे मुंबई सेंट्रल ते वरळी भागातल्या लोकांना चार दिवस पाणी मिळणार नाही. तानसा मुख्य पाईपलाईन आणखी खोल नेण्यात येणार आहे. त्याचं काम आज मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून सुरु झालंय. साधारण 6 जूनपर्यंत हे काम चालणार आहे. त्यानंतर या भागात पाणी पुरवठा सुरु होईल. म्हणूनच मुंबईकरांनो पाणी जरा जपून वापरा असा इशारा देण्यात आला आहे.

close