नक्षलवादविरोधी पथकाचे मुख्यालय आता गडचिरोलीला

June 2, 2009 9:30 AM0 commentsViews: 4

2 जूनगडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या कारवायांमध्ये मोठी वाढ झालीय त्यामुळे नागपुरातल्या नक्षलवादविरोधी पथकाचे मुख्यालय गडचिरोलीला हलवण्याची घोषणा गृहमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी 1 जून रोजी विधानपरिषदेत केली आहे. तसंच गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस विभाजन करून आणखी दोन पोलिस अधिक्षक नेमण्यात येतील अशी माहितीही त्यांनी दिली. केंद्र सरकारने नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी तीन हजार कोटींच्या कृती योजनेची घोषणा केलीय त्याचा फायदाही राज्याला मिळणार आहे. नक्षवाद्यांचं केंद्र गडचिरोलीत असताना मुख्यालय नागपूर का? असा प्रश्न गेली अनेक वर्षं विचारण्यात येत होता. त्यामुळे हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय.

close