कोईंबतूरमध्ये आढळले H1 N1 चे दोन रुग्ण

June 2, 2009 10:11 AM0 commentsViews:

2 जून H1N1 व्हायरसचा धोका अजूनही भारताला भेडसावतोय. कोईंबतूरमध्ये H1N1 व्हायरसचे दोन रुग्ण सापडले आहेत. 34 वर्षीय महिला तिच्या 5 वर्षाच्या मुलाला घेऊन मेक्सिकोहून चेन्नईला आली आहे ती आणि तिचा मुलगा दोघंही H1N1 बाधित असल्याचं सिद्ध झालंय. किंगफिशर एअरलाईन्सने आलेल्या 55 प्रवाशांचा शोध घेण्याचा प्रयत्नही अधिकारी करत आहेत. हे दोन पेशंट्स सापडल्याने आतापर्यंतची भारतात आढळलेल्या H1 N1 व्हायरसबाधित रुग्णांची संख्या 3 झाली असून जगभरात आतापर्यंत 99 लोक या H1N1 व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडले आहेत. 55 देशातल्या 15 हजार 510 लोकांना आतापर्यंत या व्हायरसचा संसर्ग झाला आहे.

close