टी-20 सराव सामन्यात टीम इंडियाचा फुसका बार

June 2, 2009 2:56 PM0 commentsViews: 5

2 जून भारताच्या मिशन वर्ल्ड कप ट्वेण्टी -20 च्या सराव सामन्यांना 1 जूनपासून सुरवात झाली. पण पहिल्याच मॅचमध्ये भारताच्या पदरी निराशा आली. न्युझीलंडविरूध्दच्या पहिल्या वहिल्या मॅचमध्ये चॅम्पियन भारताला पराभवाचा पहिला धक्का बसला. भारताने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डींगचा निर्णय घेतला. न्युझीलंडने पहिल्यांदा बॅटींग करत 20 ओव्हर्समध्ये 170 रन्स केले. परंतु भारतीय बॅट्समनला हे आव्हान पेलवलं नाही. 20 ओव्हर्समध्ये त्यांनी 6 विकेटवर 161 रन्स केले. न्युझीलंडविरूध्दचा भारताचा टी-20 चा रेकॉर्ड फारसा चांगला नाही. त्यामुळे भारताला आता दक्षिण आफ्रिकेच्या मॅचमध्ये लक्ष द्यावं लागणार आहे.

close