दिवाळखोरीत ‘जनरल मोटर्स इंडियाचं’ नाव नसल्याचा दावा

June 2, 2009 3:41 PM0 commentsViews: 1

2 जून आर्थिक मंदीमुळं जनरल मोटर्सनं दिवाळखोरी जाहीर केली.पण त्यात 'जनरल मोटर्स इंडियाचं' नाव नसल्याचं कंपनीच्या सुत्रांनी सांगितलंय. त्यामुळे जीएमच्या भारतातील कर्मचार्‍यांच्या नोकरीवर कोणताही परिणाम होणार नाही असं कंपनीचं म्हणणं आहे. पण दुसरीकडे जनरल मोटर्सला सुटे भाग पुरवणार्‍या भारतातल्या कंपन्यांना याचा फटका बसणार आहे. त्यात भारत फोर्ज, सुंदरम फास्टनर्स, सुप्रजीत इंजिनियर्स, रीको ऑटो या कंपन्याचा जनरल मोटर्सशी व्यवहार होतो. जीएमच्या दिवाळखोरीमुळे या कंपन्या आता चिंतेत पडल्यात. यापुढे जीएमच्या काही जुन्या गाड्यांची निर्मिती बंद केली जाईल अशी शक्यता आहे. त्यामुळे जीएमला सुटे भाग पुरवणार्‍या भारतीय कंपन्यांचं नुकसान होऊ शकतं.

close