बोरिवलीत 25वर्षांच्या मुलीचा गळा दाबून केला खून

June 3, 2009 8:42 AM0 commentsViews: 3

3 जून बोरिवलीतल्या सोनल बोरक्खतरिया या 25 वर्षांच्या मुलीचा गळा दाबून खून करून ऍसिडनं तिचा चेहरा भाजण्यात आला आहे. मूळच्या बोरिवलीतल्या असलेल्या सोनलचा मृतदेह ठाण्यात मिळाल्यामुळे खळबळ माजली आहे. सात दिवसांपूर्वी तिचा खून झाला असून तिच्या हत्येचं गूढ अद्यापही उकलू शकलं नसल्यानं शिवणकाम करून गुजराण करणारं तिचं कुटुंब आता न्यायासाठी झगडत आहे. 27 मेला सोनल नोकरीवर गेली होती. पण ती ऑफिसमध्ये न पोहोचल्याने तिच्या घरचे तिचा शोध घेत होते. ठाण्यातल्या घोडबंदर रोडपासून जवळच असलेल्या ब्ल्यू रुफ टॉप हॉटेलच्यामागे पानखंडा गावातल्या नाल्यात तिचा मृतदेह 27 मे रोजी दुपारी 3.00 वाजता सापडला. पालापाचोळ्यात तो लपवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. 7 दिवसानंतरही पोलीस कोणताच धागा शोधू शकलेले नाहीत. त्यामुळे गृहमंत्र्यांनीच यात लक्षं घालावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. तिच्या घरच्यांनी तिच्याच ऑफिसमध्ये काम करणा-या त्रिवेदीवर संशय व्यक्त केलाअसून तिची पर्स, तिचा एक्सट्राचा एक ड्रेस, चैन, मोबाईल यातलं काहीच अजून सापडलेलं नाही.

close