कृष्णा खोरे प्रकल्पाच्या लेखापरीक्षण अहवालावरून सभागृहात उडाला गोंधळ

June 3, 2009 9:06 AM0 commentsViews: 17

3 जून कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचा 2005-2006 चा लेखापरीक्षण अहवाल विधीमंडळात मांडण्यात आला. त्यामध्ये कृष्णा खोरे महामंडळावर 538.66 कोटी रुपयांचा हिशोब लागत नसल्याचा ठपका महालेखापाल यांनी ठेवला आहे. त्यामुळे कृष्णा खोरे प्रकल्पाच्या महामंडळाच्या लेखापरीक्षण अहवालावरून सभागृहात गोदारोळ निर्माण झाला आहे. कृष्णा खोरे प्रकल्पांतर्गत येणार्‍या 514 प्रकल्पांची सिंचन क्षमता मार्च 2006 अखेर केवळ 44.16 टक्के इतकीच झाली आहे. कृष्णा पाणी तंटा लवादानुसार महामंडळाने 2000 साला पूर्वी कृष्णा नदीचे 594 टी.एम.सी पाणी अडवून वापरायला हवं होतं. पण आतापर्यंत केवळ 60 टक्के पाणी अडवता आलं आहे. त्याचबरोबर कृष्णा खोरे प्रकल्पाची अंदाजीत किंमत 24, 924 कोटी रुपये इतकी झाली होती. अशा स्वरूपाचे ताशेरे लेखा परिक्षण अहवालात ओढण्यात आले आहेत.कृष्णा खोरे बरोबरच महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधीकरणाचा 2007-2008 चा अहवाल विधीमंडळात सादर करण्यात आला. त्यामधे राज्यातील सिंचन अनुशेष 1869 हेक्टर असून त्यासाठीची रक्कम 14 हजार 953 कोटी इतकी झाली आहे. त्यामुळे गोंधळाची नेमकी कारणं काय आहेत, याकडे लक्ष दिलं जात आहे.

close