लोकशाहीचा बाजार, मतदारांना खुल्लेआम पैसे वाटप !

October 15, 2014 6:03 PM1 commentViews:

15 ऑक्टोबर : एकीकडे लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे तर दुसरीकडे अमळनेरमध्ये लोकशाहीचा बाजार मांडला गेला. पैसे द्या आणि मतदान करा असा प्रकार सुरू होता. या प्रकरणी माजी नगरसेवक सलीम टोपी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. टोपी सध्या पोलीसांच्या ताब्यात आहे. टोपी हा अपक्ष उमेदवार शिरीष चौधरींचा समर्थक आहे. मतदान करण्यासाठी मतदारांना खुल्लमखुल्ला पैशांची ऑफर देण्यात येतेय. हा सगळा बाजार फोनमध्ये कैद झालाय. यामध्ये पैशांचा व्यवहार फोनमध्ये रेकॉर्ड झालाय. सलीम टोपी स्वत: मतदारांना पैसे वाटताना या व्हिडिओ दिसत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Sandeep

    shame shame ..

close