पाईपलाईन दुरुस्तीमुळे दक्षिण मुंबईतील पाणी पुरवठा बंद : नागरिक झाले हैराण

June 3, 2009 9:32 AM0 commentsViews: 2

3 जून तानसा पाइपलाईनची जमिनीखाली खोली वाढवण्याचं काम सुरू असल्याने गेल्या चार दिवासांपासून दक्षिण मुंबईतला पाणी पुरवठा बीएमसीने बंद केला आहे. त्यामुळे परिसरातल्या लोकांचे पाणी भरण्यासाठी हाल होत आहेत. नागरिक हैराण होत आहेत. या भागातल्या लोकांनाररात्री टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. जेव्हा रात्रीच्या वेळी टँकरने पाणी पुरवठा केला जातो तेव्हा प्रभादेवी, वरळी, परळ या भागातल्या लोकांची पाणी पुरवठ्यासाठी मोठी झुंबड उडते. आणखी तीन दिवस लोकांना असाच त्रास सहन करावा लागणार आहे. आता तर दादर, माहीम आणि माटुंगा पश्चिम या विभातही पाण्यासाठी लोकांना पुढचा एक दिवस पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे.

close