औरंगाबाद आश्रम शाळेतले शिक्षक करताहेत वेटरचं काम

June 3, 2009 9:47 AM0 commentsViews: 21

3 जून, औरंगाबाद शैक्षणिक परंपरा असलेल्या महाराष्ट्रातले काही शिक्षक रात्रीच्यावेळी वेटर म्हणून काम करत आहेत, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण ते वास्तव आहे. राज्यातील 288 केंद्रीय आश्रमशाळांना गेल्या 8 वर्षांपासून अनुदान मिळालं नाही. त्यामुळे या शाळांमधील काही शिक्षक उदरनिर्वाहासाठी रात्रीच्यावेळी वेटरच काम करत आहेत. अनुदान न मिळाल्यामुळे शिक्षकांबरोबर संस्थाचालकही हैराण झाले आहेत. औरंगाबद जिल्ह्यातल्या रावसाहेब पाटील आश्रमशाळेत हा धक्का दायक प्रकार उघडकीस आला आहे.औरंगाबादच्या रावसाहेब पाटील आश्रमशाळेला केंद्रशासनाने 8 वर्षांपूर्वीच मान्यता दिलेली होती . या शाळेमध्ये असलेल्या 20 शिक्षक आणि कर्मचा-यांना पगार तर मिळतच नाही. शिवाय विद्यार्थ्यांना योग्य त्या सेवाही पुरवल्या जात नाहीत. ही अवस्था एका आश्रमशाळेमतली नसून राज्यातल्या 288 आश्रमशाळांमधे हीच परीस्थिती आहे. 2002 साली प्रस्ताव पाठवल्यापासून या शाळा चालवल्या जातात. राज्यशासनांनी आतापर्यंत या आश्रमशाळांबद्दल कोणतीही भुमिका घेतलेली नाही. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि चंद्रकांत हंडोरे यांनी अश्वासनं देऊनही कोणतंही पाऊल न उचललंगेल्याने आता शिक्षकांनी सुरू केलेलं वेटरचं काम सध्याचे मुख्यमंत्री तरी थांबवतील का, याचं उत्तर शिक्षक शोधत आहेत.

close