युती तुटण्यास ‘सामना’ कारणीभूत -गडकरी

October 15, 2014 5:54 PM0 commentsViews:

15 ऑक्टोबर : ज्या पद्धतीने शिवसेना भाजपच्या नेत्यांचा अपमान करतीये ते अतिशय दुख:द असून, ‘सामना’च्या या लिखानातूनचं भापज शिवसेनेचे संबंध खराब होण्याची सुरूवात झाली आहे, त्यामुळे युती तुटली असं मत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी आज आयबीएन लोकमतशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

शिवसेना ज्याप्रमाणे आमच्या नेत्यांचा अपमान करतीये, नरेंद्र मोदींच्या वडिलांचा उल्लेख करून त्याचा बाप काढण्याचा काम त्यांनी सामन्यात केलं, आम्ही लाचारांची पार्टी नाहीये.आमचा कोणी सन्मान नाही केला तरी चालेल पण आम्ही आपला अपमान सहन करणार नाही अशा परखड शब्दात नितीन गडकरींनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही त्याच्या दारात अर्ज घेऊन उभे राहणार नाही, भाजप बहुमताने विजयी होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदी केवळ भाजपचे नाही तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहे. ते यूथ आयकॉन आहे, जगात त्यांच्या नावाला महत्व आहे आणि अशा प्रकारे त्याच्या अपमान करणे म्हणजे हा देशाचा आपमान आहे आणि सर्वांनी ही गोष्ट नक्की लक्षात ठेवावी असंही गडकरींनी नमूद केलं आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close